वेबसाईट की मोबाईल ऍप काय हवे? 

वेबसाईट की मोबाईल ऍप काय हवे?

वेबसाईट : जेव्हा तुमच्या वेबसाईट ला येणारे व्हिसिटर्स हे कमी प्रमाणात असतात तेव्हा वेबसाईट उपयुक्त आहे कारण वेबसाईट सर्वर हे व्हिसिटर चे लोड सहन करू शकते. उदाहरणार्थ, साधारण १०,००० व्हिसिटर पर डे असे असेल तर वेबसाईट लाच प्राधान्य द्यावे . मोबाईल ऐप ची गरज नाही त्याऐवजी रिस्पोन्सिव्ह वेबसाईट वापरावी अशी वेबसाईट मोबाईल वरून मोबाईल एप सारखीच दिसेल आणि मोबाईल ऍप बनवायची गरज पडत नाही.  अशी वेबसाईट maintain करण्यासाठी सर्वर चा साधारण खर्च हा Rs. ५००० पर month पेक्षा जास्त येत नाही.

मोबाईल ऍप : जेव्हा तुमच्या वेबसाईट ला खूप सारे व्हिसिटर्स येतात साधारण >१०,००० व्हिसिटर्स per hour तेव्हा तुमच्या सर्वर वर लोड वाढते आणि सर्वर मेन्टेनन्स ची price पण वाढते अश्या वेळेस मोबाईल ऍप बनवावे लागते कारण मोबाईल अँप एकदा मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाले कि ते फक्त सर्वर बरोबर डेटा exchange करते. फ्रंट एन्ड मोबाईल मध्ये असल्यामुळे सर्वर वरील लोड कमी होतो. पण त्यासाठी तुम्हाला मोबाइल अँप बनवून अँप स्टोर ला अपलोड करावे लागते आणि ते ऍप पॉप्युलर झाल्याशिवाय कोणी डाउनलोड करत नाही.शिवाय मोबाईल ऍप हे तुम्हाला continuous update करावे लागते तरच ऍप स्टोर वर ते लिस्टिंग राहू शकते.

मोबाइल ऍप ला लॉगिन करण्यासाठी आणि प्रॉडक्ट्स लिस्टिंग साठी *डाटाबेस* असावा लागतो. म्हणून *मोबाईल अँप बनवायच्या अगोदर वेबसाईट बनवली जाते* जेणेकरून त्याच वेबसाईट चा डाटाबेस हा मोबाईल अँप साठी बॅकेन्ड म्हणून वापरता येतो.

मोबाइल अँप maintain करण्यासाठी तुम्हाला डेव्हलपर्स maintain करावे लागतात त्यामुळे मोबाइल अँप development आणि
maintenance मिळून खर्च लाखात जातो. जेव्हा तुमच्या वेबसाईट ला व्हिसिटर्स लाखात असतात तेव्हा तुम्हाला हे परवडते कारण तेव्हा तुमचा revenue करोडो मध्ये असतो.

पण जेव्हा तुमच्या वेबसाईट ला वव्हिसिटर्स हे कमी आहेत तेव्हा *रेस्पॉन्सिव्ह वेबसाईट* बनवणे हे उचित आहे
— सागरकासार.com